कळंब – संत चोखामेळा अध्यासन केंद्र व संत चोखामेळा आरोग्य केंद्र प्रणित ‘संत चोखोबा दिनदर्शिका २०२६’ चे प्रकाशन व वितरण कार्यक्रम दिनांक २ जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर बालकाश्रम, कळंब येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा.डॉ. संजय कांबळे होते.तर प्रमुख पाहुण्यांमध्ये ह.भ.प.अशोक महाराज पुरी,धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,स्फुर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे,ज्येष्ठ नेते विलास करंजकर,वृंदावन फाउंडेशन व संत चोखोबा अध्यासन केंद्र,पुणे यांच्या कार्याध्यक्षा श्रीमती ए.डी. राऊत,वारकरी साहित्य परिषद महिला जिल्हाध्यक्षा ह.भ.प. सुनिता महाराज आडसुळ, सामाजिक कार्यकर्त्या धनश्री कवडे,सच्चिदानंद पुरी,अच्युत उर्फ बाबुराव पौळ,जयनारायण दरक, महेश जोशी,विजयकुमार वाघमारे, बशीर पठाण,नामदेव सौदागर, प्रभुलिंग झोरी आदी मान्यवर उपस्थित होते.यांच्याहस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत चोखामेळा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे निमंत्रक व ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ यांनी प्रास्ताविकातून संस्थापक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चोखोबा ते तुकोबा—एक वारी समतेची’ या संकल्पनेतून वारकरी संप्रदायातील समता, मानवता आणि बंधुता यांचे मूल्य समाजामध्ये पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली. यावेळी ह.भ.प.अशोक महाराज पुरी यांनी संत चोखोबा यांच्या निस्सीम विठ्ठलभक्तीचा उल्लेख करून संत परिवाराच्या योगदानाचा गौरव केला.अध्यक्षीय मनोगतात प्रा.डॉ.संजय कांबळे यांनी संत विचारांनी समाजाला दिलेल्या दिशा आणि मूल्यांची जपणूक होण्याची गरज अधोरेखित केली.वृंदावन फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा श्रीमती ए. डी. राऊत यांनी अध्यासन केंद्र व फाउंडेशनच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी