March 25, 2026

विद्याभवन हायस्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे दि.३ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी.,उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही.एस.व पर्यवेक्षिका कोळी जे.एन.यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आले.यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख पवार एस.जे. यांनी जिजामाता व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली.
    या प्रसंगी विद्यार्थिनी अक्षरा महामुनी हिने शिवगर्जना सादर करून दालन दणाणून टाकले. तसेच सृष्टी सांगळे,पृथ्वी दशवंत, राजनंदनी जमादार व सई डंबरे यांनी जिजाऊ व सावित्रीबाई यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे केली. सृष्टी सांगळे हिने “फुले सावित्रीबाई नसती तर मुलगी शिकली असती का?” या गीतावर मनमोहक नृत्य सादर केले.
    कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार एस.जे.यांनी केले.
error: Content is protected !!