कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि केंद्रीय हिंदी संस्था (आग्रा,उत्तर प्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,दिनांक २६ आणि २७ डिसेंबर २०२५ रोजी ‘हिंदी साहित्य में राष्ट्रीय चेतना’ (हिंदी साहित्यातील राष्ट्रीय चेतना) या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या चर्चासत्राचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ख्यातनाम साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर हे असणार आहेत.तर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्र सिंह बिसेन हे बीजभाषण करणार आहेत. या राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातील नामवंत साहित्यतज्ज्ञ,अभ्यासक, प्राध्यापक व संशोधक सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, सिनेट सदस्य डॉ.संजय कांबळे, हैदराबाद येथील डॉ. रेखा शर्मा, डॉ. फत्तराम नायक तसेच छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. अपर्णा पाटील व डॉ. सुधाकर शेंडगे यांसारख्या हिंदी साहित्यातील श्रेष्ठ अभ्यासकांचा समावेश आहे. या दोन दिवसीय चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान आणि चर्चासत्राचे मुख्य संयोजक डॉ. दत्ता साकोळे यांनी केले आहे.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव