February 8, 2026

युवकांसाठी मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम कौशल्य अभ्यासक्रम सुरू

  • धाराशिव (जिमाका) – उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा व्हावा तसेच युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात,या उद्देशाने राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत दरवर्षी सुमारे ७५ हजार युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार असून,नवीन कौशल्यावर आधारित विविध अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
    मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,टेलिकॉम,इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ड्रोन तंत्रज्ञान,ग्रीन हायड्रोजन,मोबाईल रिपेअर टेक्निशिअन,अपेरल,इलेक्ट्रॉनिक्स, सोलार टेक्निशिअन,सायबर सुरक्षा, ग्राफिक डिझाइन,टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी आदी अभ्यासक्रमांचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
    या अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://msbsvet.edu.in/Public/ITIShortTermTraining.aspx या संकेतस्थळावरून आपली इच्छुकता नोंदविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२९९४३४ वर संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!