March 26, 2026

महाडीबीटीवरील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज ३१ डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका)– शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ डिसेंबर २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे.
    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी शिष्यवृत्तींचा लाभ महाडीबीटी (MahaDBT) ऑनलाईन प्रणालीद्वारे अदा करण्यात येतो.
    शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील महाडीबीटी प्रणालीवरील अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्ज विद्यार्थी स्तरावर तसेच महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याबाबत आयुक्त,समाज कल्याण आयुक्तालय,पुणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.त्यानुसार, सदर कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवरील प्रलंबित अर्ज (विद्यार्थीस्तरावर किंवा महाविद्यालयस्तरावर) पूर्णतः निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
    त्याअनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीत एकूण २१२४ अर्ज प्रलंबित आहे.या कालावधीत हे अर्ज महाविद्यालय स्तरावरील तसेच विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहेत.
    तरी शैक्षणिक वर्ष २०१९-२०ते २०२४-२५ या कालावधीतील महाडीबीटी प्रणालीवरील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले सर्व अर्ज ३१ डिसेंबर २०२५ अखेर पूर्णतः निकाली काढण्यात यावेत.विहीत मुदतीत अर्ज निकाली न काढल्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील,याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!