June 22, 2025

धाराशिव जिल्हा पोलीस नामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.04 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 153 कारवाया करुन 1,39,000 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)दत्तात्रय गंगाराम थोरात, वय 60 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.04.12.2023 रोजी 12.30 वा. सु. उमरगा बसस्थानकच्या पाठीमागे अंदाजे 3,000 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • येरमाळा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)उध्दव भाउ काळे, वय 51 वर्षे, रा. बावी ह.मु. चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव हे दि.04.12.2023 रोजी 11.30 वा. सु. चोराखळी गावातील जगताप किराणा दुकानासमोर अंदाजे 1,550 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सुरेश मारुती जाधव, वय 34 वर्षे, रा. कौडगाव ता. जि. धाराशिव हे दि.04.12.2023 रोजी 18.00 वा. सु. कौडगाव तांड्या जवह हॉटेल त्रिमुर्ती मध्ये अंदाजे 680 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • शिराढोण पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सुनिल राजेंद्र पवार, रा. कोथळा पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव हे दि.04.12.2023 रोजी 17.40 वा. सु. कोथळा गावचे लगत त्याचे पानअपरी समोर अंदाजे 600 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ शासकिय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1) श्रीशैल शिवराय्या पाटील, रा. डिग्गी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 04.12.2023 रोजी 09.45 वा. सु. जिल्हा परिषद प्राथकमक शाळा डिग्गी येथील शाळेच्या वारंड्यात दारु पिवून येवून फिर्यादी नामे-श्रीमती सुनिता बब्रुवारन शिंदे, वय 51 वर्षे, व्यवसाय- मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्गी रा. डिग्गी, ता. उमरगा जि. धाराशिव या त्यांचे शासकीय काम पार पाडत असताना नमुद आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करुन शिवीगाळी करत असताना श्रीराम जमादार पोलीस पाटील डिग्गी हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करुन बुटाने मारहाण केली. व गावकरी सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीमती सुनिता शिंदे यांनी दि.04.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 353, 354, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे : मयत नामे- प्रविण सचिन निवरगी, रा.आदर्शनगर एमआयडीसी सोलापूर व जखमी नामे- अरविंद शरणप्पा काबनुर रा. आदर्शनगर एमआय डीसी सोलापूर हे दोघे दि.29.11.2023 रोजी 16.00 ते 17.00 वा. सु. तुळजापूर घाटात उतारावर रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 13 सीई 7791 ही वर बसून जात होते. दरम्यान कार क्र एमएच 31 एफ ई 5435 च्या चालकाने त्याचे ताब्यातील कार ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवुन जखमी नामे अरविंद काबनुर यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या आपघातात प्रविण निवरगी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अरविंद काबनुर हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. तसेच नमुद कार चालक हा आपघात करुन आपघाताची माहिती न देता कार सह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी- नरेंद्र शरणाप्पा काबनुर, वय 30 वर्षे, रा. निलमनगर एमआयडीसी सोलापूर ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.04.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब)मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे : जखमी नामे- राहुल कचरु सोनवणे, 2) राखी राहुल सोनवणे, त्यांची मुलगी- मयत नामे रोहीणी राहुल सोनवणे, वय 07 वर्षे रा. हिसोरी ता.जि. लातुर हे तिघे दि.29.11.2023 रोजी 18.30 वा. सु. जागजी गावाचे जवळ रोडवरुन मोटरसायकल वर बसून जात होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएस 0858 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्रटरला उसाच्या लोढची विना नंबर ट्रॉली जोडून व त्या ट्रॉलीला पाठीमागील बाजूस प्रकाश परावर्तीत करणारे रिप्लेक्टर अथवा रेडीयम न लावता ट्रॅक्टर ट्रॉलीसह रोडवर उभे केल्याने यातील जखमी नामे राहुल सोनवणे यांची मोटरसायकल ट्रॉलीला पाठीमागून धडक बसून अपघात झाला. या आपघातात रोहीणी राहुल सोनवणे, वय 7 वर्षे ही गंभीर जखमी होवून मयत झाली. तर राहुल सोनवणे, राखी सोनवणे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- रोहीत कचरु सोनवणे, वय 28 वर्षे, रा. हिसोरी ता.जि. लातुर यांनी दि.04.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 283, 337, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब), 187, 104, 77 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!