August 10, 2025

व्हाईस ऑफ मीडियाची बैठक पडली पार

  • धाराशिव – व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हास्तरीय मासिक बैठक दि.५ डिसेंबर रोजी पार पडली.
    धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात व्हॉईस ऑफ मीडियाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्नां संदर्भात बारामती येथील अधिवेशनामध्ये जे निर्णय पारित करण्यात आले. तसेच आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान दि.१३ ते १५डिसेंबर दरम्यान व्हॉइस ऑफ मीडियाच्यावतीने करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, शैक्षणिक विंगचे शितल वाघमारे, सलीम पठाण, कुंदन शिंदे, किरण वाघमारे, किशोर माळी, सचिन वाघमारे, आसिफ मुलाणी व प्रशांत सोनटक्के आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!