धाराशिव (जिमाका)- आयुष्मान भवः मोहिमेमध्ये अवयवदान प्रतिज्ञा व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी वेब लिंक https://notto.abdm.gov.in / pledge-registry/ व वेब साईट www.notto.mohfw.gov.in वर जाऊन आपला आधार नंबर टाकून मोबाईल ओटीपी जनरेट होईल. आलेला ओटीपी टाकून पुढील अवयवदान संमतीपत्र भरण्याची प्रक्रिया करावी. यामध्ये आपण अवयवयामध्ये लिव्हर, किडणी, पॅनक्रियाज, फुफुस, आतडे, उतीमध्ये हाडे, हृदयाच्या झडपा, कातडी, नेत्रबुब्बुळे, कार्टीलेज, रक्तवाहीनी यापैकी अवयवयाची आपण नोंदणी करताना निवड करू शकता. तसेच आपला रक्तगट टाकून आपल्या परिवारातील एका व्यक्तीचा मोबाईल नंबर नमुद करावा व या मोबाईल नंबरवर एसएमएसव्दारे अवयव नोंदणी केलेबाबतचा एसएमएस येतो जेणे करून आपण आपल्या धाराशिव जिल्ह्याची अवयव संमतीपत्राची संख्या वाढविण्यास मदत होईल. तसेच यामुळे महाराष्ट्र राज्याचे काम वाढून भारत देशाचे काम देखील वाढेल. सध्या गणपती उत्सव चालू असल्यामुळे सर्व गणेश भक्तांनी ऐच्छिकपणे अवयवदान समंतीपत्राची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकरी, कर्मचारी यांनी ऐच्छिकपणे अवयवदान समंतीपत्राची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ईस्माईल मुल्ला यांनी केले आहे
0
9 thoughts on “आयुष्मान भव: मोहिमेमध्ये अवयवदान प्रतिज्ञा व ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन .”
मला देहदान करायचे आहे . जेणेकरून माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराचा उपयोग शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना होईल.माझ्या वडिलांची नेत्रदानाची राहिलेली इच्छा मी पूर्ण करीन. मला मृत्यूनंतर करण्यात येणारे विधी आवडत नाहीत.माझ्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तीला माझ्या अवयवांचा उपयोग होईल.
मला देहदान करायचे आहे . जेणेकरून माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराचा उपयोग शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना होईल.माझ्या वडिलांची नेत्रदानाची राहिलेली इच्छा मी पूर्ण करीन. मला मृत्यूनंतर करण्यात येणारे विधी आवडत नाहीत.माझ्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तीला माझ्या अवयवांचा उपयोग होईल.
I want to donate my whole body
मला मृत्यूनंतर माझ्या शरीराचा उपयोग समाजासाठी काहीतरी होईल असे वाटते.
I want to donate my whole body to medical use
I am very greatful to having such geunine opportunity
Good
Thank you for giving me this opportunity.
Thank you for giving me this opportunity
This is my wish ❤️