February 8, 2026

आदर्श महिला उद्योजक पुरस्काराने मोनिका गवई सन्मानित

  • वाशिम – सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करीत असताना समाजातील महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून जिल्ह्यातील महिलासाठी स्वयं रोजगारच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करण्याचा व्यवसाय सुरू करून गावातील महिला पर्यंत नॅपकिन पोहचविण्याच व महिलांच्या हाताला काम मिळावं या माध्यमातून तसेच आरोग्य विषयी माहिती व सल्लागार म्हणुन नेहमी तत्पर असणाऱ्या सौ.मोनिका अजित गवई यांना आदर्श महिला उद्योजक व त्यांचे पती अजित कैलास गवई यांना त्यांच्या कार्याबद्दल बहुजन भुमी संघटना व दक्ष पोलीस पत्रकार सहकार सेना संघाच्या वतीने आदर्श मराठी उद्योजक पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यात आले.
    वानवडी पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात झालेल्या सन्मान सोहळ्यात गवई यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील काजी हैदर शेख यांचे तेरावे वंशज सोहेल शेख व कोळी नटसम्राट राजेश खर्डे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास दादा पठारे ,राष्ट्रीय महिला अध्यक्षा रोहिणी ताई भोसले,राष्ट्रीय उपाध्यक्ष रसीद पठाण,राष्ट्रीय वरीष्ठ अध्यक्ष कीर्ती पांडे,राष्ट्रीय युवक अध्यक्ष राहुल पाईकराव,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पल्लवी पाटील,कान्होपात्रा तांबारे, उप महाराष्ट्र केसरी पैलवान सादिक पठाण,राजेश भाऊ,शिला अंभोरे,गायत्री बोबडे,सुनीता अंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!