June 25, 2025

1973 च्या एस एस.सी बॅचचा कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

  • कळंब (माधवसिंग राजपूत ) – दुःख आडवा याला मित्र उंबऱ्या सारखा—– मित्र वनव्यामध्ये—- गारव्यासारखा – – – – एक तू मित्र कर — – – – आरशासारखा- – – – मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ! या कवी प्रा.अनंत राऊत यांच्या काव्यपंक्ती गुणगुणत कळंब दि. 30 नोव्हे व 1 डिसें रोजी 1973 साली कळंब शहरात एस.एस.सी. झालेल्या मुला मुलींनी वयाची 65 वर्ष ओलांडल्या नंतरही एकत्र येऊन एस.एस.सी.झाल्याचे 50 वर्षा नंतर एकत्र येऊन सुवर्ण महोत्सवी कौटुंबीक स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शहरातील बाहेर,महाराष्ट्रातील वेगवेगळे ठीकाणी,व परप्रांतात राहाणारी 25 विध्यार्थीनी व 40 विध्यार्थी यांनी आपल्या सहचरणी सहचरणी समवेत भाग घेतला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी शहाजी सोळुंके पोलीस महा निरीक्षक (से.नि.)हे संपत्नीक हजर होते. सारंगसर,टोणगे,मोराळे या सहस्त्र चंद्र पुर्ण केलेल्या व जाधव,श्रीमती मिटकरी ताई,सौ. कुसुमताई जोशी
    या 75 वर्ष पुर्ण केलेल्या गुरूजनांचा तसेच सौ.मथुरा बाई व श्री.नरहरी कोठावळे या वयाची अनुक्रमे 96 व 93 वर्ष पुर्ण केलेल्या 1973 चे वर्ग मित्र प्रा.शिवाजी कोठावळे(से.नि) याचे आई वडीलांचा शाल, श्रीफळ,हार,विठ्ठल रुकमीणीची मुर्ती व गौरव पत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार वेद मुर्ती अनिल जोशी,अविनाश जोशी,सुभाष हरदास यांच्या मंत्रधोषात पाध्य पुजन करुन करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या स्नेह मिलन सोहळ्या चे नियोजन इंजि. अशोक पोरे यानी केले. या कार्यक्रमात परिचय मेळावा,विवीध गुणदर्शन, भक्तीगीत,भाव गिते,नाट्यगायन, कथाकथन,भारूड,पोवाडा, गोंधळ,जोगवा प्रामुख्याने विध्या देशमुख,कल्पना भुमकर,वनिता भडंगे,अशोक पोरे यांनी सादर करुण बहार आनली. या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता प्रा. मनोरमा भवर,बसवराज राजमाने, आरूण जोशी,सुरेश कोकाटे, बाळासाहेब बोराडे,प्रा.सुरवसे, मंगला सोनी,मारोती काळे,प्रा. केशव वरपे,गोविंद देशमुख, गोविंद पौळ या 1973 च्या वर्ग मित्रांनी विशेष परिश्रम घेतले. बैठक व निवास व्यवस्था सभा मंडपात सह समीर देशमुख पांडे यांनी माफक दरात केली. स्वादिष्ट भोजन श्रीओम मंगल सेवा चे मालक नरेश कुलकर्णी व दर्शन पोरे यांनी अल्प दरात दिले. तरुणांना लाजवेल असा बहारदार सुवर्ण महोत्सवी कौटुंबीकस्नेह मिलन सोहळा वयाच्या 68 वर्षात विशेष परिश्रम घेऊन अशोक पोरे यांनी 50 वर्षा पुर्वी शिक्षण घेत असलेल्या मित्रांना एकत्र करुन यशस्वी केल्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
error: Content is protected !!