कळंब – निजाम काळात बहुजनांच्या मुलांना आधुनिक व दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, या दृढ ध्येयातून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा या संस्थेची स्थापना करून मराठवाड्यात शाळा,माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयांची उभारणी केली. संस्थेचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध विद्यालयांत गुरुजींना अभिवादन करण्यात आले.
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा ता. भूम,जि.धाराशिव –
मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ शिक्षक शशिकांत मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक आनंद रामटेके,शिक्षक नामदेव अनंत्रे, संघपाल सोनकांबळे, शिक्षिका निर्मला वाघमारे,सुजित जाधव,बबन यादव आदी उपस्थित होते.
गुरुजींचे मूळगाव — ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा ता.कळंब
मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुजींना अभिवादन करण्यात आले. पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा. सुनील साबळे,सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञान प्रसार प्राथमिक प्रशाला, मोहा
येथेही शिक्षक कमलाकर शेवाळे, श्रीमती उषा पांचाळ,धनंजय परजणे यांच्या उपस्थितीत गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
संभाजी विद्यालय,पिंपळगाव लिंगी ता.वाशी
येथे गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक सुनिल बावकर,संतोष ढोले, संतोष बोडके, सुहास जगताप तसेच शिक्षकेतर कर्मचारी शिवराम शिंदे,फुरडे एल.आर. आदींची उपस्थिती होती.
मराठवाड्यातील विविध विद्यालयांनी एकाच दिवशी शिक्षण महर्षींच्या कार्याचा गौरव करीत दिलेले अभिवादन म्हणजे लोकशिक्षणाच्या त्या अखंड ज्योतीला वाहिलेली कृतज्ञता होय.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी