धाराशिव (जिमाका)–जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय आणि चाइल्ड हेल्प लाईन १०९८ यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथील जवाहर विद्यालय,अणदूर तसेच नगर परिषद शाळा क्र.२१ येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.हा उपक्रम प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी. कोवे व चाइल्ड हेल्प लाईन प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत बालहक्क,बालविवाह,तसेच मुलांच्या समस्या या विषयांवर चर्चा करण्यात आली.बालकांच्या संरक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देत,चाइल्ड हेल्प लाईन १०९८ या सेवेशी संपर्क कसा साधायचा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. चाइल्ड हेल्प लाईन कक्षाच्या समुपदेशिका वंदना कांबळे,ए.डी. काळे व प्रज्ञा बनसोडे यांनी बालकांच्या हक्कांबाबत आणि हेल्पलाईनच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.तर सूपरवायजर श्रीमती पल्लवी पाटील यांनी १०९८ चाइल्ड हेल्प लाईन कक्षाचे उद्दिष्ट आणि मुलांच्या सुरक्षेसाठी त्याचे महत्त्व सांगितले. या वेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक जी.बी.कुलकर्णी व एस.एस.धोत्रे, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये बालहक्क,सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान