मोहा — ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने, तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथील सहशिक्षिका नीता सोनवणे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य तर्फे दिला जाणारा सन 2025 चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. नीता सोनवणे या सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असून,शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात येत आहे. या यशाबद्दल प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते नीता सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पर्यवेक्षक सतीश कानगुडे, प्रा. सुनील साबळे, प्रा. चंद्रशेखर गिरी, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चंद्रशेखर गिरी यांनी केले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन