February 8, 2026

“वंदे मातरम्” गीताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्ञान प्रसार विद्यालय,मोहा येथे समूहगायन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा चे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ गीताच्या २५० व्या वर्षानिमित्त भव्य समूहगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    १५० वर्षांपूर्वी बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या या गीताने स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा दिली. या ऐतिहासिक गीताच्या स्मरणार्थ देशभरात एकाच वेळी झालेल्या समूहगायन उपक्रमात मोहा विद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
    कार्यक्रमात विद्यार्थिनी श्रुती इंगळे, प्रियंका जाधव व श्रावणी वीर यांनी “वंदे मातरम्” या गीताचा अर्थ व प्रेरणा सांगितली, तर सहशिक्षक सतीश मडके यांनी या गीताचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान प्रभावीपणे मांडले.
    कार्यक्रमास प्राचार्य अविनाश मोरे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सुनील साबळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चंद्रशेखर गिरी, प्रा. देवदत्त पाटील व प्रथमेश साडेकर यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
error: Content is protected !!