तेलेवाडी पाटी — “बौद्ध धम्मातील पंचांग प्रणाम,ध्यानधारणा या सर्व गोष्टी या विज्ञानवादी आहेत आणि माणसाच्या उद्धाराचा खरा मार्ग म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा धम्म होय,”असे प्रतिपादन भिक्षुनी आर्यामेताजी यांनी केले. कार्तिक पौर्णिमा निमित्ताने दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी बुद्धसृष्टी विपश्यना केंद्र,तेलेवाडी पाटी येथे त्यांच्या प्रेरणादायी धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न, बोधीसत्व प्रज्ञासूर्य,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण,अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलन करून त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.
भिक्षुनी आर्यामेताजी यांनी आपल्या धम्मदेसनेत सांगितले की,१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म हा मानवमुक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे सर्व बौद्ध उपासक व उपासिकांनी बौद्ध आचारसंहितेचे पालन करून धम्ममार्गावर चालावे,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भिक्षुनी आर्यामेताजी यांनी सतिश टोणगे यांना बुद्धवादी विचारवंत,बौद्ध जीवन संस्कार हे पाठ्यपुस्तक सप्रेम भेट म्हणून दिले.
या वेळी पत्रकार संघाचे विश्वस्त सतिश टोणगे,सा.साक्षी पावनज्योतचे कार्यकारी संपादक अविनाश घोडके तसेच बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन