भोगजी— शांत,सयंमी,मनमिळावू स्वभावाचे आणि बहुजनांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने कार्यरत असलेले सा.साक्षी पावनज्योत चे वर्गणीदार ज्येष्ठ सहायक शिक्षक चंद्रकांत वाघमारे यांची सर्वोदय विद्यालय भोगजी येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे. या प्रसंगी त्यांच्या सन्मानार्थ स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक गौतम जाधवर, संस्थेचे सचिव संजय जाधवर,मुंढे सर,शेख सर,सौ.घुले मॅडम, सुनील हांगे, भागवत शिंदे,दीपक घुगे व चंद्रकांत खराटे आदी मान्यवर उपस्थित होते. समर्पण,शिस्त आणि शैक्षणिक निष्ठा यांच्या बळावर वाघमारे सर नक्कीच संस्थेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी नवे अध्याय रचतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी