कळंब – नगरपरिषद निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून विविध प्रभागांमध्ये इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.प्रभाग क्रमांक ४ मधून अभिजीत हौसलमल यांनी नगरसेवकपदासाठी आपली इच्छुकता जाहीर केली आहे. अभिजीत हौसलमल हे तरुण, उत्साही आणि समाजकारणाशी निगडित व्यक्तिमत्त्व म्हणून कळंब शहरात ओळखले जातात. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत शहरातील युवकांमध्ये जनजागृती घडवली आहे.स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारा आणि नागरिकांशी थेट संपर्क ठेवणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.निवडणुकीत नागरिकांच्या मूलभूत गरजा स्वच्छता,पिण्याचे पाणी,रस्ते दुरुस्ती आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती मुद्यांवर काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कळंब या शहराच्या विकासासाठी आणि तरुणांच्या आवाजाला न्याय देण्यासाठी मी प्रभाग क्रमांक ४ मधून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे,असे अभिजीत हौसलमल यांनी सांगितले. नगरपालिकेतील बदलत्या राजकीय वातावरणात त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत असून,या प्रभागात आता लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी