February 8, 2026

संगणक ही आता जीवनावश्यक गरज — खासदार बजरंग सोनवणे

  • ॲपटेक सिस्टीम्स’चे उद्घाटन व ‘ॲपटेक कॉम्प्युटर एज्युकेशन’च्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
  • कळंब – सध्याचे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स व संगणकाचे युग आहे. त्यामुळे प्रत्येकाने संगणकाचे ज्ञान घेणे अत्यावश्यक आहे.संगणक किंवा लॅपटॉप आता जीवनावश्यक गरज बनली आहे,असे प्रतिपादन खासदार बजरंग सोनवणे यांनी केले.
    ते कळंब येथील प्रसिद्ध ॲपटेक कॉम्प्युटर एज्युकेशनच्या तिसाव्या वर्धापन दिन व ॲपटेक सिस्टीम्स या नव्या आस्थापनेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी (आप्पा) कापसे यांनी भूषवले.
    कार्यक्रमात एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर, उपसभापती प्रा.श्रीधर भवर,प्रा.डॉ.बाळकृष्ण भवर,अनिल घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
    सुरुवातीला खासदार सोनवणे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून नवीन ॲपटेक सिस्टीम्सचे उद्घाटन करण्यात आले.
    सा.साक्षी पावनज्योतचे वर्गणीदार तथा ॲपटेक संचालक संजय घुले यांनी प्रास्ताविक करताना ॲपटेक कॉम्प्युटर एज्युकेशनच्या ३० वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. तसेच नव्याने सुरू झालेल्या ॲपटेक सिस्टीम्समध्ये मिळणाऱ्या संगणक संच, लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरे,प्रिंटर आदी उत्पादने व सेवेबाबत सविस्तर माहिती दिली.
    एमकेसीएलचे समन्वयक धनंजय जेवळीकर यांनी संजय घुले यांच्या संगणक शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सभापती शिवाजी (आप्पा) कापसे व उपसभापती श्रीधर भवर यांनीही घुले परिवाराचे अभिनंदन करून नव्या आस्थापनेस उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
    या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधवर, संजय देवगड,डॉ.अमित पाटील, डॉ.सुनील थळकरी, विकास यादव, संतोष महामुनी, अरविंद शिंदे,अतुल कवडे,रोहन पारख, सतीश टोणगे,लखन गायकवाड,अजय हौसलमल आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सूर्यकांत काळे यांनी मानले.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण चव्हाण, गाजी मोमीन, शैलेश रणदिवे, सचिन थोरात, राहुल फाटक, अनिकेत वाडेकर, हरी ओम भवर यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!