कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने काम करणाऱ्या ‘सा.साक्षी पावनज्योत’ या साप्ताहीकाचा दिपावली विशेषांक कळंब शहरातून समाजातील मान्यवरांना सप्रेम भेट म्हणून देण्यात आला. दि.१ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित या उपक्रमात शिवसेनेचे जिल्हा नेते अजित (दादा) पिंगळे, भारतीय जनता पक्षाचे मिनाज शेख,किशोर वाघमारे,सतपाल बनसोडे,अमृत जाधव यांना हा विशेषांक सादर करण्यात आला. या प्रसंगी उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी,तसेच पक्षांतील नव्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत विचारविनिमय करण्यात आला. स्थानिक राजकारणातील घडामोडी,सामाजिक बांधिलकी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरही चर्चा झाली. कळंब नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांमध्ये सामाजिक एकता, पारदर्शक विकास आणि तरुण नेतृत्वाला संधी मिळावी,या विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मते मांडली. ‘सा.साक्षी पावनज्योत’च्या विशेषांकाद्वारे समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज प्रभावीपणे मांडला जात असून, यंदाच्या दिपावली अंकात “बहुजनांचा न्याय आणि नवसंघर्ष” हा मुख्य विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करत संपादकीय मंडळाचे अभिनंदन केले व पुढील काळातही सामाजिक भान जागृत ठेवणारे कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी