कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा.अनिल शहाजी फाटक यांना नुकतीच ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांनी मार्गदर्शक डॉ.दया पाटील (सरस्वती भुवन कला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर ) यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. या उज्ज्वल यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर,सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, भागवत गव्हाणे (सहसचिव) प्रा.अंकुश पाटील (कोषाध्यक्ष), संचालक तात्यासाहेब पाटील, रमेशभाऊ मोहेकर (प्रशासकीय अधिकारी) प्रा.अंजली मोहेकर आदी मान्यवरांनी त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच उपप्राचार्य डॉ.के.डी. जाधव, प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी, अधीक्षक हनुमंत जाधव, सहायक ग्रंथपाल अरविंद शिंदे, संतोष मोरे,राजश्री भारती, संगीता रुमणे, मनिषा लिमकर, भारत शेळके,दत्तात्रय गावडे, करण बोराडे, कमलाकर बंडगर, उमेश साळुंखे यांनीही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे .
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार