February 9, 2026

कळंब नगरपालिकेत महायुतीत भेग!रिपाईचा स्वबळाचा नारा – शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

  • कळंब – आगामी कळंब नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नेही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसू शकतो,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
    नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उमेदवारीसंदर्भातील पोस्ट्स टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच शहरातील प्रमुख नेत्यांकडून कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले जात आहेत,असे कार्यकर्ते सांगतात.
    दरम्यान,घटक पक्षांना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे महायुतीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून,त्यावर शिवसेनेने अजूनही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. त्याच पार्श्वभूमीवर रिपाईनेही बंडाचा सूर धरला आहे.त्यामुळे महायुतीतील दोन घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने युतीच्या गणितात मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    राजकीय निरीक्षकांच्या मते, आता सर्वांचे लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना घटक पक्षांची नाराजी दूर करण्यात कितपत यशस्वी ठरते, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
  • 🟦 रिपाईची बैठक संपन्न
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची बैठक मराठवाडा प्रदेश सचिव बंडुभाऊ बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत पक्षाने नगर पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला.
    या बैठकीस तालुका अध्यक्ष शिवाजी सिरसट, युवक तालुका अध्यक्ष विपिन हौसलमल,शहर अध्यक्ष सुधीर बनसोडे,तसेच मुकुंद मामा साखरे,नामदेव गायकवाड,नामदेव गायकवाड, अमोल जगताप,इकबाल तांबोळी, विश्वजित बनसोडे,आदर्श शहाजी सिरसट,विनोद बचुटे,सागर ताटे, संग्राम बनसोडे,गौतम सिरसट, सुरज गाडे,यश बनसोडे,रोहन कोळपे,निलेश जगताप,राजाभाऊ घाडगे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
  • 🟨 तीन प्रभागांमध्ये रिपाईचा प्रभाव
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा प्रभाग क्रमांक ३,४ आणि ८ मध्ये प्रभावशाली पकड आहे.त्यामुळे रिपाईने जर या प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवारी दिली,तर महायुतीच्या मतांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या निर्णयामुळे कळंब नगर पालिका निवडणुकीत मोठा राजकीय कलाटणीचा अंदाज वर्तवला जात आहे.
error: Content is protected !!