धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बधितांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या विशेष मदत (Relief Package) व विविध सवलती लागू करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील धाराशिव,तुळजापूर,उमरगा, लोहारा,भूम,परंडा,कळंब व वाशी या तालुक्यांमधील अनेक गावे अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली असून शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. या आदेशानुसार बाधित भागातील नागरिकांना पुढीलप्रमाणे सवलती मिळणार आहेत.यामध्ये जमिन महसुलातून सूट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीवर स्थगिती (एक वर्षासाठी) तिमाही वीज बिलावर माफी,१० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकरी,नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आदेशाची अंमलबजावणी संबंधित विभागांनी तातडीने करून अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य