February 9, 2026

महापुरात मृत्यू झालेल्या राम नवनाथ ताटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

  • कळंब – तालुक्यातील परिसरात झालेल्या अतिवृष्टीत मस्सा (खं) येथील नदीच्या पाण्यात वाहून राम नवनाथ ताटे वय ३४ या तरुणाचा दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.
    दरम्यान,राम नवनाथ ताटे यांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्व समाजघटकांकडून त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
    महापुरात मृत्यू झालेल्या राम नवनाथ ताटे यांच्या कुटुंबीयांची सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके,ह.भ.प. महादेव महाराज आडसूळ व ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी सांत्वनपर भेट घेतली.
    या वेळी कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
    याप्रसंगी ह.भ.प. महादेव महाराज आडसूळ यांनी मयत राम ताटे यांच्या पत्नीला साडी-चोळी तसेच तिन्ही मुलांना कपड्यांची मदत केली. त्यांच्या या संवेदनशील कृतीबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.
    याप्रसंगी सरपंच त्रिंबक कचरे, उपसरपंच संदीप तांदळे,सदस्य मोहन ताटे,चंद्रकांत ताटे,बंडु ताटे,मयत राम चे वडील नवनाथ ताटे,आई रंजना ताटे,पत्नी पल्लवी ताटे,मुलगा प्रेम राम ताटे इयत्ता ९ वी,प्रणव राम ताटे इयत्ता ६ वी व रुद्र राम ताटे इयत्ता ३ री,चुलते भिवाजी ताटे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
    मयत ताटे यांच्या कुटुंबियांना दानशूर व्यक्तींनी पवन ताटे गुगल फोन पे नंबर ७२१८६२८११३ या नंबरवर आर्थिक मदत करून कुटुंबीयास आधार द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!