धाराशिव – धाराशिव येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कळंब येथील ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत चमक दाखवली असून अनेक खेळाडूंनी विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. स्क्वॅश या खेळातील जिल्हास्तरीय स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. स्क्वॅश विजेते खेळाडू– १४ वर्षे वयोगट (मुले):विनय राजाभाऊ शिंदे,विवेक शिवाजी शिंदे,राहुल महादेव बोंदर,प्रेम विष्णू नरवडे.१४ वर्षे वयोगट (मुली)– शिवक्रांती अतुल गायकवाड,सिद्धी तानाजी वाघमारे,प्रिया सुनील गायकवाड, अमृता शाहू सावंत १७ वर्षे वयोगट (मुले): वेदांत बालाजी पवार १७ वर्षे वयोगट (मुली): वसुंधरा मुकुंद नांगरे, प्रगती दत्तात्रय गायकवाड, आकांक्षा अमोल सिरसट बुद्धिबळ स्पर्धा – १७ वर्षे वयोगटात प्रथमेश शिंदे याने तर १९ वर्षे वयोगटात तेजश्री माळी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे सर्व खेळाडू धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभागीय क्रीडा स्पर्धेत करणार आहेत. दरम्यान,डिकसळ येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्येही विद्याभवनच्या खेळाडूंनी झळाळते यश मिळवले. १४ वर्षे गट – आगरी साळुंखे – २०० मी. प्रथम क्रमांक,संदेश पवार – ४०० मी. प्रथम क्रमांक,ओंकार गुजर – ४०० मी. द्वितीय क्रमांक ४×१०० रिले – प्रथम क्रमांक (श्रेयश जाधवर,अवीर साळुंखे, ओंकार मडके,ओंकार गुजर, संदेश पवार) १४ वर्षे गट (मुली)–शिवक्रांती गायकवाड – ६०० मी. प्रथम,सिद्धी वाघमारे – ४०० मी. द्वितीय,अमृता सावंत – ४०० मी. प्रथम,४×१०० रिले संघ – प्रथम क्रमांक (शिवक्रांती गायकवाड, अमृता सावंत, सिद्धी वाघमारे, प्रिया गायकवाड, प्रगती गायकवाड, सिद्धी कवडे) १७ वर्षे गट (मुले)– आशिष बोरगे – गोळाफेक प्रथम,बालपिक प्रथम, २०० मीटर धावणे द्वितीय,शिवराज डोंगरे – ४०० मीटर धावणे प्रथम १७ वर्षे गट (मुली) –वसुंधरा नांगरे – गोळाफेक प्रथम,थाळीफेक प्रथम या सर्व विजेत्या खेळाडूंचा विद्याभवन हायस्कूलच्या वतीने शाळेत सत्कार करण्यात आला. या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख संजय मडके व सुरज मडके यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल बापू मोहेकर,सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी., उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही.एस., पर्यवेक्षक कोळी जे.एन. तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार एस.जे. यांनी केले तर आभार तीर्थकर एस.एस. यांनी मानले. सर्व मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर