August 8, 2025

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी धाराशिवचा मुलीचा संघ ठाणे येथे रवाना

  • कळंब – ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचा मुलींचा संघ रवाना झाला असून यासाठी शहरातील प्रमुख मान्यवरांनी व क्रीडाप्रेमीनी या संघाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. दि.१डिसेंबर २०२३ पासून ठाणे येथे राज्यस्तरीय मुख्यमंत्री कबड्डी चषक स्पर्धा संपन्न होत आहे .धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्यस्तरावर करण्यासाठी कळंब येथे जिल्ह्यातील मुलीच्या संघाची निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये बारा खेळाडूंची निवड करण्यात आली असून या संघातील निवडक खेळाडूंची राज्याच्या संघासाठी निवड केली जाणार आहे.निवडीसाठी राज्यातील एकूण 31 संघ दाखल होत असून यातून निवडक खेळाडूंचा राज्य संघात समावेश होणार आहे. या संघात निकिता जावळे (कर्णधार ), साक्षी गिल्डा अपेक्षा जावळे, रुपाली कुरुंद, श्रावणी कुरुंद, दिक्षिता रीटे, प्रांजली भराटे , साक्षी भराटे, अपूर्वा भराटे, सोनाली शिंदे, वैष्णवी बाबर, संध्या राठोड यांची निवड झाली .धाराशिव जिल्ह्याच्या संघाला येडाई व्यसनमुक्ती केंद्र येरमाळा चे संस्थापक डॉ.संदीप तांबारे यांच्या वतीने ट्रॅक सूट व किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार सतीश टोणगे,बालाजी आडसुळ, संजय घुले, प्रा.जगदीश गवळी, संजय मडके ,सोमनाथ साबळे, वाघमोडे,ओंकार काळे यांच्यासह ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मण मोहिते, राजाभाऊ शिंदे, रमेश मोहिते, संग्राम मोहिते, दिनेश खोसे, निलेश माळी आदींनी खेळाडूना प्रोत्साहन देऊन भरभरून शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!