धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.28 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 303 कारवाया करुन 2,15,750 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
मुरुम पोलीस ठाणे: आरोपी नामे-राचय्या मडोळ्या स्वामी, वय 35 वर्षे, रा. केसरजवळगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.28.09.2025 रोजी 12.15 वा. सु विष्णु पाटील यांचे कोट्याजवळ केसरजवळगा येथे अंदाजे 1,800 ₹ किंमतीची 18 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-अशोक राजाराम वाघमारे, वय 55 वर्षे, रा. आनंदनगर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.28.09.2025 रोजी 14.30 वा. सु आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 3,000 ₹ किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-फुलसिंग उर्फ चंदन भिमराव राठोड, वय 32 वर्षे, रा. नाईकनगर तांडा सु. ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.28.09.2025 रोजी 19.30 वा. सु आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,280 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 32 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
परंडा पोलीस ठाणे: आरोपी नामे-सत्यजित प्रविण चौतमहाल, वय 28 वर्षे, रा. भिमनगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे दि.28.09.2025 रोजी 18.10 वा. सु रचना हॉटेल शेजारी पानटपरीच्या आडोशाला करमाळा रोड परंडा येथे अंदाजे 5,400 ₹ किंमतीची 30 लिटर गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे-मंगेश गणपत खवले, वय 25 वर्षे, रा. बोडका ता. परंडा जि. धाराशिव हे दि.28.09.2025 रोजी 19.30 वा. सु बावची शिवार येथे पत्र्याचे शेडमध्ये अंदाजे 1,500 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये परंडा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
वाशी पोलीस ठाणे: आरोपी नामे-ताई राजेंद्र काळे, वय 48 वर्षे, रा.पारधी पिडी पार्डी ता. वाशी जि. धाराशिव या दि.28.09.2025 रोजी 14.55 वा. सु आपल्या राहत्या घराचे पाठीमागे अंदाजे 10,250 ₹ किंमतीची 30 लिटर गावठी दारु व 150 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
शिराढोण पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान शिराढोण पोलीसांनी दि.28.09.2025 रोजी 17.20 वा. सु.शिराढोण पो ठाणे हद्दीत रांजणी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-मुन्शी लतीब सय्यद, जावेद इफतेकार काझी दोघे रा. रांजणी ता. कळंब जि. धाराशिव हे 17.20 वा. सु. रांजणी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 620 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले शिराढोण पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ गावशिवारात आरडा ओरड करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-नरसिंग दगडू कांबळे, वय 45 वर्षे, रा. हिप्परगा रवा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.28.09.2025 रोजी 08.00 वा. सु.छत्रपती शिवाजी महाराज चौक हिप्परगा रवा येथे मद्यधुंद अवस्थेत गोधंळ घालून गावातील लोकांना विनाकारण शिवीगाळ करुन मदाका कलम 85(1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे आरोपी नामे-साजिद अब्दुल रहिम कासार, वय 36 वर्षे, रा. वाडवणा ता. उदगीर जि. लातुर, फरीद महंमद शेख, वय 32 वर्षे, रा. रेणुका नगर रेणापुर ता. जि. लातुर यांनी दि.28.09.2025 रोजी 21.30 वा. सु. तामलवाउी टोलनाका येथे आयशर क्र एमएच 24 एयु 9064 मध्ये गोवंशीय जातीचे 18 जर्सी गायी व 3 वासरे असे एकुण 3,66,000₹ किंमतीचे वाहनासह 13,66,000₹ किंमतीचे गोवंशीय जातीचे गायी व वासरे त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करताना तामलवाडी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (1) (के) सह प्राणी संरक्षण अधिनियम 5(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-अभिजीत मधुकर गुरव, वय 42 वर्षे, रा.सिध्देश्वर वडगाव ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे पाठीमागील खिडकीचे काच अज्ञात व्यक्तीने दि.28.09.2025 रोजी 10.00 ते 19.00 वा. सु. फोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटामध्ये ठेवलेले 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 30,000₹ असा एकुण 40,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अभिजीत गुरव यांनी दि.28.09.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(3), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-कविता देवी पर्णचंद्राराव गंटा, वय 48 वर्षे, व्यवसाय सिनियर सिव्हील जज, जहीराबाद ता. जहीराबाद जि.संघारेड्डी तेलंगाना या दि.28.09.2025 रोजी 19.00 वा. सु. हॉटेल अशोक येथे जेवन करत असताना हॉटेल बाहेर लावलेली महिंद्र एक्स यु व्ही 700 गाडी क्र टी एस 28 एल 6666 हिचा काच अज्ञात व्यक्तीने फोडून गाडीतील ईटकरी बॅग व एक काळ्या रंगाची हॅंड बॅग मधील 120 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,मोबाईल फोन, रोख रक्कम 35,000₹ व नविन कपडे असा एकुण 5,24,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कविता देवी गंटा यांनी दि.28.09.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“फसवणुक.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-गणेश सतिश चव्हाण, रा.पाथरुड ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.13.01.2025 रोजी ते दि. 04.02.2025 रोजी मोबाईलवरुन फिर्यादी नामे- प्रशांत सतिश नाईकवाडी, वय 35 वर्षे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मा. मंत्री महोदय व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री हे माझे ओळखीचे आहेत असे सांगुन गावातील केलेली कामे दाखवून जिल्हा नियोजन समिती मधून कामे मंजूर करुन देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीस कोणतेही शासकीय काम मिळवून न देता फिर्यादी यांचे कडून वेळोवेळी एकुण 5,95,000₹ ऑनलाईन घेवून फिर्यादीची फसवणुक केली. व पैसे परत मागीतले असता जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रशांत नाईकवाडी यांनी दि.28.09.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 351 (2)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
कळंब पोलीस ठाणे: मयत नामे-सुनिल प्रभु खैरमोडे, वय 53 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि.08.07.2025 रोजी 05.30 ते 07.00 वा. सु. मोहीणी हॉटेलच्या बाजूला येरमाळा ते कळंब रोडवरुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून सुनिल खैरमोडे यांना धडक दिली. या अपघातात सुनिल खैरमोडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच अज्ञात वाहन चालक हा जखमीस उपचार कामी दाखल न करता तसाच निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मालन सुनिल खैरमोडे, वय 48 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.28.09.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125 (अ), 125 (ब) 106(1) सह कलम 134 (अ) (ब), 184 मोवाकाअन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे-अदित्य संतोष पांचगे, वय 18 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव व सोबत जखमी नामे-रणजित बृम्हादेव सेटगार, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.09.2025 रोजी 21.00 वा. सु. उमरगा ते गुंजोटी रोडवरुन पायी जात होते. दरम्यान जैन मंदीराजवळील वळणावर मोटरसायक क्र एमएच 25 एयु 7617 चा चालक आरोपी नामे- विठ्ठल शिवाजी साळुंके, रा. चिंचोली जाहागीर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अदित्य पांचगे व रणजित सेटगार यांना धडक दिली. या अपघातात अदित्य पांचगे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर रणजित सेटगार हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तात्रय रघुनाथ पांचगे, वय 47 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.28.09.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125 (अ), 125 (ब) 106(1) सह कलम 184 मोवाकाअन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान