धाराशिव (जिमाका) –जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी व खासापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठावरील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,चांदणी धरणावरील २८ स्वयंचलित गेट पैकी तब्बल २२ गेट उघडण्यात आली असून १३ हजार ६७१ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.धरणातील येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार हा विसर्ग वाढण्याची अथवा कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान,खासापूर धरणाच्या सांडव्यावरून तब्बल २० हजार ७३८ क्युसेकने विसर्ग सुरू असून, आवक वाढल्यास पुढील काही तासांत विसर्गात बदल होऊ शकतो,अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर चांदणी व उल्फा नदीच्या काठावरील गावांतील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व सतर्क राहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान