धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.26 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 102 कारवाया करुन 63,600 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“अवैध मद्य विरोधी कारवाई.”
मा.पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली काल शुक्रवार दि.26.09.2025 रोजी अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्हयात पोलीस ठाणे हद्दीत 13 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेले 120 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 307 लिटर गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्याअसे मद्य जप्त करण्यात आले. सदर जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 44,325 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 13 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)भुम पो ठाणेच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-लता दादा काळे, वय 47 वर्षे, रा. कल्याणनगर पारधी पिडी भुम ता. भुम जि. धाराशिव या 07.30 वा. सु.कल्याणनगर पारधी पिडी भुम येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 8,000 किंमतीची 100 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-चंद्रकला अरुण काळे, वय 50 वर्षे, रा. कल्याणनगर पारधी पिडी भुम ता. भुम जि. धाराशिव या 08.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 8,000 किंमतीची 100 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-हिरा कल्याण पवार, वय 65 वर्षे, रा. कोष्टी गल्ली भुम ता. भुम जि. धाराशिव या 09.45 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,000 किंमतीची 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.आरोपी नामे-गिताबाई रमेश काळे, वय 38 वर्षे, रा. कल्याणनगर पारधी पिडी भुम ता. भुम जि.धाराशिव हे 10.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 7,200 किंमतीची 90 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
2)उमरगा पो ठाणेच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-नितीन बळीराम गायकवाड, वय 25 वर्षे, रा.चिंचोली भुयार ता.उमरगा जि. धाराशिव हे 12.30 वा. सु. प्रॉपर उमरगा शहरात साठे चौक येथे अंदाजे 2,000 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-कार्तिक नागनाथ कांबळे, वय 34 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.00 वा. सु. अंकुश काळे यांचे किराणा दुकानाच्या बाजूला माडज येथे अंदाजे 2,700 किंमतीची 27 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-लख्न उर्फ अमोल अशोक जाधव, वय 35 वर्षे, रा. कवठा ता.उमरगा जि. धाराशिव हे 18.00 वा. सु. आपल्या राहत्या घराचे बाजूस रिकामे जागेत कवठा येथे अंदाजे 2,500 किंमतीची 25 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-लक्ष्मण बब्रुवान भालेराव, वय 51 वर्षे, रा. दाबका ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. डिग्गी रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.20 वा. सु. हॉटेल विश्वा बारच्याशेजारी डिग्गी रोड उमरगा येथे अंदाजे 4,500 किंमतीची 45 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
3) कळंब पो ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-विजय बाबु पवार, वय 38 वर्षे, रा.डिकसळ पारधी वस्ती ता. कळंब जि. धाराशिव हे 14.05 वा. सु. डिकसळ येथील जुनी दुध डेअरी जवळील पारधी वस्ती येथे अंदाजे 2,400 किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
4) शिराढोण पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-दादाराव रामचंद्र घोगरे, नायगाव ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. मुरुड ता. जि. लातुर हे 10.00 वा. सु.नायगाव ते मुरुड जाणारे रोडलगत रुद्र हॉटेलच्या पाठीमागे अंदाजे 3,485 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-उत्तम रंगनाथ शेळके, वय 48 वर्षे, रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे 19.45 वा. सु. खामसवाडी येथे जगदंबा चौकात रोडचृया कडेला मोकळ्या जागेत अंदाजे 1,100 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
5)वाशी पो ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-सोमनाथ लक्ष्मण कवडे, वय 29 वर्षे, रा.वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे 21.00 वा. सु. वाशी ते इंदापूर जाणारे रोडलगत आरोपीचे पत्राचे टपरीचे पाइीमागील बाजूस मोकळ्या जागेत अंदाजे 800 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
6) नळदुर्ग पो ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-विलास रामचंद्र चव्हाण, वय 46 वर्षे, रा.तुळजाभवानी साखर कारखाना नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 20.30 वा. सु. मानेवाडी पाटीजवळील गॅस गोडावून शेउच्या आडोशास ता. तुळजापूर येथे अंदाजे 640 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
“ जुगार विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.26.09.2025 रोजी 14.10 ते 16.40 वा. सु.उमरगा पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-विठ्ठल तुकाराम कोळी, वय 48 वर्षे, रा. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.10 वा. सु. रविराज हॉअेल समोर मोकळ्या जागेत कसगी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 720 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-विश्वजित बाबुराव भोसले, वय 46 वर्षे, रा. रामपूर ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.40 वा. सु.रामपुर येथील परमेश्वर घोडके यांचे किराणा दुकानासमोर चिंचेच्या झाडाखाली कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 620 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.26.09.2025 रोजी 12.40 वा. सु.बेंबळी पो ठाणे हद्दीत पाटोदा गावातील चौकामध्ये पाटोदा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बलभिम महादेव ढोले, वय 45 वर्षे, रा. पाटोदा ता. जि. धाराशिव हे 12.40 वा. सु. पाटोदा गावातील चौकामध्ये पाटोदा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,020 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले बेंबळी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव ग्रामीण पोलीसांनी दि.26.09.2025 रोजी 16.30 वा. सु.धाराशिव ग्रामीण पो ठाणे हद्दीत मारुती मंदीराचे पाठीमागे लातुर रोडवर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-शिवदास सुधाकर नकाते, वय 38 वर्षे, रा. समता नगर येडशी ता. जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. मारुती मंदीराचे पाठीमागे लातुर रोडवर मिलन डे मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव ग्रामीण पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.26.09.2025 रोजी 16.10 वा. सु.तुळजापूर पो ठाणे हद्दीत किरण पेठे यांच्या दुकानात छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-किरण रामभाउ बागडे, वय 43 वर्षे, रा. एसबीआय बॅक बाजूला नळदुर्ग रोड तुळजापूर ता.तुळजापूर जि. धाराशिव हे 16.10 वा. सु. किरण पेठे यांच्या दुकानात कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,05,600 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.26.09.2025 रोजी 18.40 वा. सु.ढोकी पो ठाणे हद्दीत पेट्रोलपंप चौक ढोकी जवळील तानाजी फुलचंद सौदागर रा. ढोकी यांचे पत्राचे शेड समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-राजाभाउ नरसु सोनटक्के, वय 55 वर्षे, रा. ढोराळा ता. कळंब जि. धाराशिव, हनुमंत भाउराव बोंदर, वय 41 वर्षे, रा. देवधानोरा ता. कळंब जि. धाराशिव हे 18.40 वा. सु. पेट्रोलपंप चौक ढोकी जवळील तानाजी फुलचंद सौदागर रा. ढोकी यांचे पत्राचे शेड समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 26,450 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात”
अंबी पोलीस ठाणे :अंबी पो.ठा.चे पथक दि.25.09.2025 रोजी 23.00 वा. सु. अंबी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास आनाळा बसस्थानक येथे आडोशाला अंधाराचा दबा धरुन बसलेले एक इसम दिसून आल्याने पथकास त्याचा संशय आल्याने पथकाने त्यास हाटकले. यावर त्याची विचारपुस केली असता त्यानी आपली नाव-ज्ञानेश्वर मोहन जाधव, वय 35 वर्षे, रा. बिडसांगवी ता. आष्टी जि. बीड ह.मु. आनाळा ता. परंडा जि. धाराशिव असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यानी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ते माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे आरोपी नामे- मैनोद्दीन उमर, वय 38 वर्षे, रा. फकीरा नगर वैराग नाका धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.26.09.2025 रोजी 19.44 वा. सु. खिरणीमळा धाराशिव येथे अशोक लिलॅड मालवाहक क्र एमएच 25 पी 57185 मध्ये 2,520 किलो 5,04,000₹ किंमतीचे गोवंशीय जातीचे जनावरांची कत्तल करुन जनावरांचे मांस विक्रीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करताना धाराशिव शहर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राणी संरक्षण अधिनियम 5(सी), 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ ज्वलनशिल पदार्थ व अवैध गुटख विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
भुम पोलीस ठाणे आरोपी नामे- हनुमंत राजाभाउ जाधव, वय 40 वर्षे, रा. चिंचपुर ढगे ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.26.09.2025 रोजी 15.00 वा. सु. किर्तेश्वर टायर्स व किराणा दुकान वालवड रोड चिंचपुर ढगे ता. भुम येथे विना परवाना बेकायदेशीर रित्या अत्यावश्यक वस्तु व ज्वलनशिल पदार्थ डिझेल पेट्रोल सदृश्य द्रव पदार्थ यामुळे मानवी जिवीतास संभाव्य धोक्यापासुन व कोणत्याही व्यक्तीला दुखापत किंवा क्षती पोचवण्याचा संभाव असले असे कृति करुन एकुण 15,756₹ किंमतीचा व महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ राजनिवास पान मसाला, हिरा पान मसाला, छोटा विमल पान मसाला, असा एकुण 25,763 ₹ किंमतीचे विक्री करीत जवळ बाळगलेला असताना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द भा.न्या.सं. कलम 287, 123, 274,275, सह कलम 3, 7 अत्यावश्यकवस्तु अधिनियम, सहअन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम 26 (2)(i),26 (2)(iv),27 (3)(डी), 27(3)(इ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-शिवराज युवराज साठे, वय 40 वर्षे, रा. मंगळवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 0382 ही दि. 21.09.2025 रोजी 23.00 ते दि.22.09.2025 रोजी 02.38 वा. सु. शिवराज साठे यांचे राहते घरासमोरुन येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवराज साठे यांनी दि.26.09.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-महेश दिलीप महानवर, शुभम ज्योतीराम पांढरे, आकाश दिनेश शेंडगे, ज्ञानेश्वर भारत ठवरे, आण्णा महानवर, सर्व रा. देवकते गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.20.09.2025 रोजी 10.00 वा. सु. देवकते गल्ली धाराशिव येथे फिर्यादी नामे-तानाजी किसन देवकते, वय 49 वर्षे, रा. देवकते गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गरब्याच्या कार्यक्रमात झालेल्या बोलण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण जखमी झाले. देवकते गल्ली काय तुझे बापाची आहे का अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तानाजी देवकते यांनी दि.26.09.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव शहर येथे भा.न्या.सं.कलम 189,191 (2), 190, 115(2), 352,351(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-खंडु रंगनाथ भिसे, अजय खंडु भिसे, मार्तंड रंगनाथ भिसे, विष्णु भिसे, वैभव विष्णु भिसे, सोमनाथ मुकुंद भिसे, बबुलु सोमनाथ भिसे, सर्व रा. राजुरी ता. जि. धाराशिव यांनी दि.26.09.2025 रोजी 08.00 वा. सु. खंडोबा मंदीरा समोर राजुरी शिवार येथे फिर्यादी नामे-रेश्मा महादेव साळुंखे, वय 51 वर्षे, रा. राजुरी ता. जि. धाराशिव यांचे पती महादेव, मुलगा व मुलगी यांना नमुद आरोपींनी मागील भाडंणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रेश्मा साळुंखे यांनी दि.26.09.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे बेंबळी येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 189(2), 191 (2), 190, 115(2), 352, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-शिवकुमार आण्णाप्पा जमादार, रा. खंडाळा ता. आळंद जि.गुलबर्गा, व सोबत मयत नामे- शोभा नवनाथ भोसले, वय 29 वर्षे, रा. आनंदवाडी ता. बसवकल्याण जि. बिदर हे दोघे दि.06.09.2025 रोजी 17.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 बीडी 5806 वरुन जात होते. दरम्यान उमरगा ते कासार शिरसी रोडवर कुन्हाळी गावाचे पुढे कदमापुर पाटीजवळ आरोपी शिवकुमार जमादार यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल रोडवरील खड्डयात आदळल्याने पाठीमागे बसलेली शोभा भोसले या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नवनाथ मुरली भोसले, वय30 वर्षे, रा. आनंदवाडी जी. ता. बसवकल्याण जि. बिदर राज्य कर्नाटक यांनी दि.26.09.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125 (अ), 125(ब), 106(1) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:मयत नामे-सुवर्णा प्रविण राठोड, वय 22 वर्षे, रा.जहागिरदारवाडी तांडा ता. जि. धाराशिव यांनी दि.26.09.2025 रोजी 02.55 वा. सु. जहागिरदारवाडी येथे राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-सासरे लिंबा जेमा राठोड, सासु मोताबाई राठोड, पति प्रविण लिंबा राठोड, दिर सागर राठोड, नंनद बालीका नेताजी चव्हाण सर्व रा. जहागिरदारवाडी तांडा ता. जि. धाराशिव यांनी मयत सुवर्णा हिस शिवीगाळ करुन मारहाण करुन शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांचे त्रासास कंटाळुन मयत सुवर्णा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लक्ष्मण पांडा आडे, वय 48 वर्षे, रा. हणमंतवाडी ता. रेणापुर जि. लातुर यांनी दि.26.09.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 108, 85, 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र यांनी श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र मोहत्सवा निमीत्त भेट देवून बंदोबस्ताचा आढावा घेतला.”
धाराशिव जिल्ह्यातील श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव यात्रा ही दि.22.09.2025 ते 02.10.2025 साजरी होणार आहे. यानिमित्त श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगर यांनी श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव याठिकाणी दि.26.09.2025 रोजी भेट देवून मंदीर परीसर, यात्रा परिसर, पाहणी करुन यात्रा बंदोबस्त कामी नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी, पोलीस अमंलदार, होमागार्ड यांना योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले. तसेच बंदोबस्त कामी हजर असणारे पोलीस अंमलदार यांना रेनकोट वाटप केले. सांस्कृतिक कार्यक्रम सैनिक स्कुल मैदान तुळजापूर येथे भेट दिली. सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.निलेश देशमुख, तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोनि श्री. मांजरे, बंदोबस्तावरील अधिकारी अंमलदार हजर होते.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान