February 9, 2026

“एम.डी.थ्री” यापासून अलिप्त राहण्याचे आवाहन — लक्ष्मण धावारे

  • हावरगाव– मोबाईल,डीजे,डॉल्बी आणि डाव य “एम.डी.थ्री” संस्कृतीपासून तरुणांनी अलिप्त राहावे, असे स्पष्ट आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव लक्ष्मण धावारे यांनी केले.
    कळंब तालुक्यातील हावरगाव येथे आयोजित वर्षावास प्रवचन प्रसंगी ते बोलत होते.भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यु.जी. बोराडे यांच्या आदेशान्वये कळंब तालुक्यातील अनेक गावांमध्ये वर्षावास प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.
    धम्माचा प्रचार-प्रसार अखंडपणे प्रवाहित करून चांगल्या विचारांचे चिंतन व मनन करणे हे आजच्या समाजासाठी अत्यावश्यक असल्याचे धावारे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,
    “सात्विक विचाराचे चिंतन केल्याने मानव दोष आणि द्वेषापासून दूर राहतो. हीच परंपरा बुद्धांच्या काळापासून ते संतांच्या काळापर्यंत चालत आलेली आहे. तरुणांनी व्यसनाधीनतेपासून, डीजे-डॉल्बीच्या मोहापासून मुक्त होऊन शिक्षण, चिंतन आणि समाजहिताचे कार्य याकडे लक्ष द्यावे.”
    कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे समन्वयक सी.आर.घाडगे यांनी तरुणांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतक्या पदव्या घेण्याचे, तसेच महिलांनी रमाईच्या त्यागातून प्रेरणा घ्यावी” असे आवाहन केले.
    या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक उपासक सदाशिव शिनगारे, प्रभाकर खंडागळे, एल.आय.सी.चे निवृत्त अधिकारी गौतम वाघमारे, दादा ढगे, धीरज गायकवाड, बापू जोगदंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेजर विठ्ठल हजारे,मेजर शाहू (आबा) हजारे,संग्राम हजारे,सुधाकर हजारे,अजय हजारे,अर्जुन हजारे, काशिनाथ लगाडे,बाबुराव हजारे, आशाबाई हजारे,गंगुबाई हजारे, रेखाताई हजारे,भागीरथी कसबे आदींनी परिश्रम घेतले.
    सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मेजर विठ्ठल (तात्या) हजारे यांनी केले. कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
error: Content is protected !!