✦ लोकशाही रक्षणासाठी राज्यव्यापी हाक ✦
- कळंब – घटना विरोधी, जनविरोधी आणि लोकशाही विरोधी ठरणाऱ्या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी जन आंदोलनास कळंब शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दि.१० सप्टेंबर २०२५ वार बुधवार रोजी जन सुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी १२ वाजता भव्य निदर्शने आयोजित करण्यात आली. - या निदर्शनानंतर मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मंडळ अधिकारी गणेश जगताप,तलाठी पूजा गायकवाड व सहाय्यक निरीक्षक हनुमंत कांबळे यांच्या हस्ते निवेदन स्वीकृत करण्यात आले.
- निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक – २००४ हे विधिमंडळाच्या अधिवेशनात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले असले तरी ते घटना विरोधी, लोकशाहीस बाधक व जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे आहे.म्हणूनच हे विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
- या निवेदनावर विविध पक्ष, संघटना व सामाजिक चळवळींच्या मान्यवरांनी सह्या केल्या असून, लोकशाही व घटनात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे आवाज बुलंद केला.
- या निवेदनावर भारत जोडो अभियानाचे जिल्हा समन्वयक सुभाष घोडके,शहर समन्वयक माधवसिंग राजपूत,जन सुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीचे तालुका समन्वयक सी.आर. घाडगे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष मुसद्दीक काजी, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सौ.ज्योतीताई सपाटे,समन्वयक ॲड. शिलानंद शिनगारे,बांधकाम मजूर अध्यक्ष भारत जाधव,संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड,विरोधी संघर्ष समितीचे मिलिंद रणदिवे,
- के.पी.शिंदे,एम.पी.गायकवाड, यशवंत हौसलमल,बळीराम माने, सायसराव जाधवर,शिवसेना (उ.बा.ठा) चे शहरप्रमुख विश्वजित जाधव,तसेच भीमा हगारे, आशुतोष मोरे,लक्ष्मण धावारे, राजकुमार जावळे आदींचा समावेश आहे.
- कळंब शहरातील या आंदोलनाने “लोकशाही वाचवा – जन सुरक्षा कायदा रद्द करा” हा नारा बुलंद करत राज्यातील जनतेच्या भावना अधोरेखित केल्या.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन