August 9, 2026

जिल्ह्यातील नागरिकांसाठी शासनाच्या सेवांची माहिती आता डिजिटल स्वरूपात.

  • धाराशिव (जिमाका) – धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला डिजिटल इंडिया व सुशासन या तत्वांवर आधारित विविध शासकीय सेवा,योजना व माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.
    जिल्हा प्रशासनाने अधिकृत TuljAI हा AI सहाय्यक डिजिटल मार्गदर्शक सुरू केला असून,तो धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://dharashiv.maharashtra.gov.in तसेच WhatsApp क्रमांक ९३७१९८९३२१ वर उपलब्ध आहे.
    या डिजिटल मार्गदर्शकाच्या माध्यमातून नागरिकांना शेतकरी आत्महत्या,नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप,संजय गांधी निराधार योजना, बालक व बाल सेवा,पिक विमा योजना,पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना,अन्न व नागरी पुरवठा, नेत्रसंपदा हेल्पलाईन, स्वातंत्र्यसैनिक मानधन,सामान्य संपर्क इत्यादी शासकीय योजना व सेवांची माहिती तसेच अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
    या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या मातृभाषेत, सोप्या पद्धतीने व एका क्लिकवर शासनाच्या योजनांची माहिती मिळणे शक्य झाले आहे
error: Content is protected !!