
- कळंब – समाजासाठी झटणाऱ्या व्यक्ती व संस्थांची खरी ओळख ही त्यांच्या कार्यातूनच होते.जातपात न पाहता,वंचित घटकांच्या गरजेनुसार मदतीचा हात पुढे करणे हेच सामाजिक कार्यकर्त्यांचे ध्येय असते.गेल्या अनेक वर्षांपासून कळंब येथील दयावान प्रतिष्ठानने आपले वेगळेपण सिद्ध करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
कोरोना काळात या प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान (भाई) मुल्ला आणि त्यांच्या मित्रपरिवाराने गरजूंना धान्यकिटचे वाटप करून, वैद्यकीय व इतर स्वरूपातील मदत करून कौतुकास्पद कार्य केले. शहरात रुग्णवाहिकेची वाढती गरज ओळखून प्रतिष्ठानने ना नफा-ना तोटा तत्वावर लोकसहभागातून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
पूर्वीही या संस्थेने समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १६ अनाथ मुलींच्या नावे मुदत ठेव रक्कम योजना सुरू केली.तर,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ संविधान प्रतींचे वाटप करून समाजाला जागृतीचा संदेश दिला.
यंदा मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण होत असून,हा उपक्रम समाजासाठी वरदान ठरणार आहे.याशिवाय वृक्षारोपण,शालेय साहित्य वाटप, मूकबधिर व दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्नदान,तसेच शिवजयंती, गणेशोत्सव,पैगंबर जयंती,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती आदी प्रसंगी समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातात.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला,उपाध्यक्ष इम्रान काझी, सचिव अभय गायकवाड व पदाधिकारी यांनी केलेल्या कार्यातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते.समाजहितासाठी झटणाऱ्या या संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.

More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन