February 9, 2026

जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी जन आंदोलन

  • कळंब – जन विरोधी,घटना विरोधी व लोकशाही विरोधी असलेला जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी राज्याव्यापी जन आंदोलन दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
    याचाच एक भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व जिल्ह्यावर १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज किंवा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत.
    जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात होत असलेल्या राजव्यापी जन आंदोलनात भारत जोडो अभियान,शिवसेना (उ.बा.ठा),काँग्रेस (इं),राष्ट्रवादी (श.प ),भाकप,माकप,शेकाप, फॉरवर्ड ब्लॉक,समाजवादी पार्टी, आरपीआय (सेक्युलर),जन आंदोलन संघर्ष समिती,श्रमिक मुक्ती दल आणि सर्व डावे, समाजवादी,आंबेडकरवादी, प्रागतिक,धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी पक्ष,संघटना आणि व्यक्ती सहभागी होत आहेत.
    तरी आपल्या तालुक्यावर किंवा जिल्ह्यावर होत असलेल्या या भव्य निदर्शनाच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जन सुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती धाराशिव जिल्हा समन्वयक विजय गायकवाड व भारत जोडो अभियानाचे धाराशिव जिल्हा समन्वयक सुभाष घोडके यांनी केले आहे.

 

error: Content is protected !!