February 9, 2026

बहुजन जनता पक्षात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन निवड

  • कळंब – बहुजन जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड.के.बालाजी घुमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष विकास भाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातील विविध पदांसाठी ऑनलाईन नियुक्त्या करण्यात आल्या.
    या नियुक्त्यांमध्ये पुढीलप्रमाणे पदाधिकारी निवड करण्यात आले आहेत –
    बालाजी मुरलीधर जगताप – महाराष्ट्र युवक सचिव,पंडू खंडाळे – लोहारा तालुका अध्यक्ष,संजय भाऊ खंडाळे – लोहारा तालुका उपाध्यक्ष,विकास शिंदे (गोवर्धनवाडी) – धाराशिव जिल्हा संघटक,बालाजी भाऊ दाभाडे – ढोकी तालुका शहर अध्यक्ष,आनंद कांबळे – कळंब तालुका शहर अध्यक्ष,गौर.संतोष भाऊ लोंढे – कळंब तालुका उपाध्यक्ष
    या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष विकास भाऊ गायकवाड यांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी हे सर्व पदाधिकारी कार्यरत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    कार्यक्रमाचे समन्वयन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले असून, बहुजन जनता पक्षाच्या आगामी कार्ययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
error: Content is protected !!