March 26, 2026

तुळसामावशी नावाचं झुंजारू पिंपळपान गळालं…आता राहिल्या केवळ आठवणी…!

  • (०५ सप्टेंबर २०२५ )
  • लातूर जिल्ह्यातील मौ.गोंदेगाव अर्थात जन्मभूमीतील प्रति मातृत्व तुळसाबाई सटवाजी सोनवणे तथा मावशीनी नश्वर जगाचा कायमचा निरोप घेतला.नितिन देडेनी टाकलेली सकाळी ०७. ४९ ची भावपूर्ण श्रद्धांजली ..खूप उशीरांनं वाचली.सत्यता अखिल भारतीय काँग्रेस लातूर तालुका युवक सरचिटणीस अमोल भैय्या देडे याच्याकडून पडताळून पाहिली. दोन तीन दिवस जास्त आजारी होत्या आज सकाळी गेल्या..खातरजमा झाली.नि:शब्द झालो.! उभं राहून दोन मिनिटे थांबलो.लिहित्या हाताला कंफ फुटला.गेल्या दीड महिन्याभरातली भेट..? अन् आज दु:खद निधनाची खबर.? वाटलं नव्हतं लवकर मावशी exit घेईल.. निरक्षर असूनही समाजात वावरणारी.. झोपडपट्टी रहिवासी वाद,रमाई घरकुल योजना,तंटामुक्ती असो की,ग्रामसभा.! गावकीतील भावभाकीतील वादही मध्यस्थी करून सोडवणारी गावातील झुंजार रणरागिणी.! भीमजयंतीला सरपंच, उपसरपंच, गावातील पुढारी, प्रतिष्ठीत नागरिकांत जावून वर्गणीला मावशीचा हातभार असायचाच.! झुंजार पिंपळपान गळालं.आवाज थांबला.कालकथित चंद्रभागाकाकू, सीताबाई सदाशिव सोनवणे, तुळसा बाबू सोनवणे मामी,गयाबाई नाना सोनवणे यांच्यानंतर.आज तुळसाबाई सटवाजी सोनवणे अनंताच्या प्रवासाला निघून गेली.परत कधीही न् येण्यासाठी.,बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा काठावरचं मौ.अकोला आमचं आजोळ ,अन् यांचं माहेर..!
    तीसरं काळीज जीवाभावाचं कालकथित झालं .!.सौ.जनाबाई, गौतम विलास तीन लेकरांची माय गेली .सटवा काकांना जावून वर्षे झालं नाही तोवर मातृछत्र हारवलं. आसवं वघळली. डोळे भरून आले अन् शेकडो आठवणी एकसाथ उभ्या राहिल्या.!माय माझी “आक्का “,आजारी असली की, तीचं आजारपणं, सुखदुःखात मावशी मदत करायची.मला लगेच फोन करून बोलायची.लवकर ये आक्काला बरं नाही..!गावकी ,भावकीपेक्षा एका जीवाच्या माझी आक्का, गयाबाई अन्‌ तुळसामावशी, अजातशत्रूच्या चिरंतन आठवणींनी मनाचा ताबा घेतला… एकच गर्दी केली बहुआयामी प्रती मातृत्त्वाच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी धडपड निरर्थक झाली.लांबचा पल्ला असल्याने हातही पोरके झाले.मावशी भावपूर्ण आदरांजली .! भोगलेल्या दिवसाला दिवस जातील असे वाटत असतानाच नियतीने घात केला.काबाडकष्ट करून झिजलेल्या व्यक्तीमत्वाला एका टुमदार रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचं स्वप्नं साकार होण्यासाठीचं.. लेकरांचीही अनास्था दिसली.”कसेल त्याची जमीन”, सिलींग कायदा इस.सन.१९७८ चा असूनही येथे झोपडपट्टी घरकुल कबाला हक्काचा मिळू नये .? मामलेदाराच्या सहीचा कागद स्वातंत्र्याच्या साठीनंतरही मूलनिवासी रहिवाशांना मिळू नये? प्रस्थापित गावगाडा सांभाळणारे सत्तासंघर्ष सत्र न्यायालयातून संभाजी नगर खंडपीठात नेहणारे ,मालक करतात तरी काय? सामाजिक सलोखा राखण्याची, जबाबदारी सांभाळणाऱ्यांना याचही भान नसावं.? दुर्दैव सांधताना न्याय चिखलात माखू‌ नये.गावकुसाहेरचं जीणं‌ दीवाभीतीचं होवू नये.मी गावी आलो की,मावशी वंचितांच्या वेदना माझ्याजवळ सैल करायची.आम्ही जागरूक नागरिक पत्रकार या नात्याने सजगता म्हणून प्रयत्न करीत असतो. आपलं कसं होईल? कुठं कमी तर पडणार नाही ना? मनाच्या एका कोपऱ्यात वाटायचं.! सार्वजनिक जीवनात वावरतानां सामंजस्याने सोडवणूक व्हायला हवी.back benchers म्हणून का रहायचं.,? मावशीनं झालेली अडवणूक सांगितली.गोरोबा रामा सोनवणे यांनी आमच्या जागेवर आक्रमण करून माझ्या आण्णांना दिलेला त्रास, अन् त्याची सोडवणूक करण्यासाठी जिजाबाईं तथा नानी व मावशीनं केलेली मध्यस्थी आज उजागर करतांना मायेचं आभाळ भरून आलं.! ते शब्द हृदयाला भिडले.आज ती आठवण दाटून आली.!मिलिंद सोनवणे याच्या टेम्पोमधून १३जुलैचं रविवार भाचे सुरेश आदमाने यांच्या प्रियंका कन्येचा मंगलपरिणय आटोपून मौ.पिंपरी (आंबा) ते खंडाळा पाटीला तुळसा मावशीसह सौ.रंजनाभाबी अन् श्रीमती उषावहिनीसह वीस मिनीटाचा प्रवासी सहवास.! दिवंगत आक्काच्या आठवणी काढत आत्मीय संवाद खंडाळा बसथांब्यावर थांबला. तीला उतरवलं .मीही उतरलो .पन्नास रुपये नको रं बाबा ; नको म्हणता म्हणता आम्ही चहापान कर म्हणून हाती ठेवले.चरणस्पर्श केला.हिसोरी मार्गे गोंदेगावकडे दूरवर नजर टाकली.अन्‌ काळीज भरून आलं.! मावशीला बघत होतो.पण टेम्पो बोरगावच्या (काळे) दिशेने निघाला.
    ऐकण्याच्या ओघात चाळीस मिनिटे कधी गेले याचा पताही लागला नाही. कौटुंबिक स्वास्थ्य अन् प्रश्न विचारले.धाकला लेक विलासची भ्रांत तीला सतावत होती. मावशी बोलत रहायची .आणि आम्ही मार्गस्थ करणारं सांगत रहायचो.तीची रस मधाळ भावनीक ओघवती वाणी ऐकत राहावी…बाबा, बरं हाऊत का.? लेकरं कशी आहेत? सौ.सरमीला कशी आहे? अशी खुशाली विचारणारी माऊलीची चीरनीद्रा काळीज कापणारी..आता तो आवाज आज कायमचा बंद झाला. ज्यांच्यात आम्हाला प्रती आदरर्भाव चीरंतर मातृत्व दिसायचं..”कालकथित तुळसामावशीस” भावपूर्ण आदरांजली !अलविदा मावशी !! तूझ्या शेकडो आठवणी कायम स्मरणात राहातील….! एकमात्र खरं‌ तुळसामावशी नावाचं झुंजारू पिंपळपान गळालं.माझ्यासहित तूझ्या लेकरांना नियतीनं वियोग सोसण्याचं बळ द्यावं.भावपूर्ण अभिवादन.!
  • — @ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे
    महाराष्ट्र शासन,उपसंपादक सा.साक्षी पावन ज्योत,जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, रुग्णहक्क संरक्षण समिती, विशेष कार्यकारी अधिकारी SEO +९३२४३६६७०९
error: Content is protected !!