धाराशिव (जिमाका)- जिल्ह्यातील नागरिकांच्या शासकीय कामकाजामधील अडचणी व तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून “जनता दरबार” हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय,तहसील व मंडळ स्तरावर राबविण्यात येत आहे. नागरिकांना त्यांच्या अडचणी व तक्रारी मांडण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत संधी उपलब्ध होणार आहे.या वेळेत उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या समक्ष थेट संवाद साधता येणार असून अर्जही दाखल करता येणार आहेत.तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य