धाराशिव ( सतिश घोडेराव यांजकडून )- परांडा तालुक्यातील मौजे भांडगाव मधील दलित समाजाच्या स्मशानभूमीवर ग्रामपंचायतकडून शासकीय योजनेच्या नावाखाली बेकायदा बांधकाम सुरू करण्यात आले आहे.हा प्रकार समाजातील शांतता व धार्मिक भावनांना धक्का देणार आहे त्यामुळे स्मशानभूमीवरील बेकायदा अतिक्रमण तात्काळ थांबावावे व वितिक्रमण प्रतिबंधक कायदा अनुसूचित जाती,जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिलेल्या निवदेनातून केली आहे. परंडा तालुक्यातील मौजे भांडगावमधील दलित समाजाच्या स्मशानभूमीवर ग्रामपंचायतकडून शासकीय योजनेच्या नावाखाली बेकायदा बांधकाम सुरू करण्यात आले आहे. हा प्रकार समाजातील शांतता आणि धार्मिक भावनांना धक्का देणारा आहे. त्यामुळे स्मशानभूमीवरील बेकायदा ग्रामपंचायत,सरपंच,ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि शाखा अभियंते जाणून- बुजून कटकारस्थान करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. यासाठी जबाबदार दोर्षीना सेवेतून तत्काळ निलंबित करावे,अन्यथा तीव्र आंदोलन करू पवित्र स्मशानभूमीचे रक्षण केले जाईल,असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,तालुकाध्यक्ष संपत सरवदे आदींच्या सह्या आहेत.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य