February 9, 2026

प्रा.मारुती कुंभार यांना पीएच.डी.पदवी प्राप्त

  • खामसवाडी – कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील सुपुत्र मारुती बळीराम कुंभार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.
    प्रा.डॉ.प्रकाश कुलाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन भौतिकशास्त्र विषयात पार पडले. “Synthesis and Characterisation of Cobalt and Copper Doped Nickel Oxide Thin Films Prepared by SILAR Method”हा त्यांचा प्रबंध विषय होता.
    या संशोधनातून कमी खर्चिक नवीन थिन फिल्म्स इलेक्ट्रोड्स विकसित करण्यात आले असून ते सुपर कॅपॅसिटर व गॅस सेन्सर यासाठी कार्यक्षम आहेत.विशेषतः भविष्यात ऊर्जा साठवणूक व पर्यावरणातील अमोनिया गॅस शोषणासाठी यांचा उपयुक्त वापर होऊ शकतो.
    चार वर्षांच्या या संशोधन कालावधीत त्यांनी ९ आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रकाशित केले असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण केले आहे.
    त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामसवाडी येथे झाले.उच्च माध्यमिक व बी.एस्सी शिक्षण रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथे तर बी.एड.के.टी. पाटील अध्यापक महाविद्यालय, धाराशिव येथून पूर्ण केले.पुढे राजर्षी शाहू महाविद्यालयातून एम.एस्सी.पूर्ण करून तेथेच अध्यापनाचे कार्यही केले.तसेच, सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची SET परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत.
    आपल्या या यशाबद्दल डॉ.मारुती कुंभार म्हणाले की, “माझ्या यशात माझे कुटुंब,मार्गदर्शक तसेच मित्रपरिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.”
    या यशाबद्दल गावकरी व समस्त शिक्षणप्रेमी खामसवाडीकरांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!