March 25, 2026

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कार ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले

  • धाराशिव (जिमाका)- उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०२४-२५ करिता “डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” तसेच “डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येणार आहेत.
    राज्यातील “अ”, “ब”, “क” व “ड” वर्गातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १ लक्ष रुपये, ७५ हजार रुपये,५० हजार रुपये व २५ हजार इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येईल.
    राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तर प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख रक्कम,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व ग्रंथभेट देण्यात येणार आहे.
    इच्छुक ग्रंथालये,कार्यकर्ते व सेवक यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतीत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी,धाराशिव यांच्या कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
error: Content is protected !!