धाराशिव – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धाराशिव शाखेची बैठक छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अनिसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस उत्रेश्वर बिराजदार यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी स्फूर्तिगीत गाऊन बैठकीचा शुभारंभ केला. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “विद्यान,निर्भयता आणि नीती हीच अनिसची विचारधारा आहे. अंधश्रद्धा आणि शोषणाविरोधात लढा देत वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार–प्रसार करणे हेच आमचे ध्येय आहे. वाईट रूढी-परंपरांची चिकित्सा करून संत, समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचा वैचारिक वारसा जोपासणे हे अनिसचे प्रमुख कार्य आहे. आज जनतेत जागृती होत असून, लोक स्वतःहून अनिसच्या उपक्रमात सहभागी होऊ लागले आहेत.” या बैठकीस अनिसचे अब्दूल लतीफ, गणेश वाघमारे, विजय गायकवाड, सिद्धेश्वर बेलुरे, वामन पंडागळे व ॲड. अजय वाघाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश्वर बेलुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय गायकवाड यांनी मानले.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य