February 8, 2026

ज्ञान प्रसार उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षक–पालक सभा उत्साहात

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी ज्ञान प्रसार उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथे शिक्षक–पालक सभेचे आयोजन करण्यात आले. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षकांच्या मेळाव्याचे आयोजन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर व पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

  • सभेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.चंद्रशेखर गिरी यांनी केले. त्यानंतर प्रा.नवनाथ करंजकर,प्रा. देवदत्त पाटील,प्रा.विठ्ठल जाधव, प्रा.अमित जाधव यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले.उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांनी पालकांशी संवाद साधताना “शिक्षक, विद्यार्थी आणि पालक असा समन्वय राहिला तर विद्यार्थ्यांची प्रगती अधिक वेगाने होईल,” असे प्रतिपादन केले. तसेच आगामी परीक्षा नियोजन, शिक्षकांचे प्रयत्न आणि विद्यार्थ्यांच्या तयारीसंबंधी पालकांना माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
  • कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.श्रीमती प्रतिभा सावंत यांनी मानले.या प्रसंगी बारावीच्या वर्गाला शिकवणारे प्रा.राहुल भिसे, प्रा. रोहित मोहेकर, प्रा.दिग्विजय पाटील,अनुप पाटील यांच्यासह विद्यार्थी व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
error: Content is protected !!