August 8, 2025

कळंब शहरात मोकाट जनावरे,कुत्रे व डुकरांचा सुळसुळाट!

कळंब – केंद्र व राज्य शासनाचे सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानात कळंब तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर.व्ही.चकोर यांनी केले.
15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत केंद्र व राज्य शासनातर्फे स्वच्छता ही सेवा अभियान कचरामुक्त भारत या संकल्पनेवर आधारित सुरू आहे. यामुळे कळंब तालुक्यातील ग्रामपंचायती,शाळा, अंगणवाडी,प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लोकसभागातून स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यात प्रामुख्याने गावस्तरावर दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी स्वच्छता रन कार्यक्रम घ्यावे, दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छतेचे/सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करणे व कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे, दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी स्वच्छता संवाद,दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणे, सार्वजनिक परिसराची स्वच्छता, स्वच्छता फेरी,स्वच्छता शपथ इत्यादि कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत गट विकास अधिकारी चाकोर.आर. व्ही यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिले आहेत.

error: Content is protected !!