मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि, २1 ऑगस्ट रोजी मोहा येथील आरोग्य उपकेंद्राच्या वतीने कळंब तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे. एन.सय्यद,प्राथमिक आरोग्य केंद्र मोहा येथील आरोग्य अधिकारी डॉ. सुमित मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील १० ते १९ वयोगटातील मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. शाळेतील मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करत असताना मध्यम व सौम्य स्वरूपातील रक्तशय असणाऱ्या मुलींना औषध उपचार देण्यात आले. यावेळी मुलींना पोषण आहार व मासिक पाळी या विषयी आरोग्य विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी आरोग्य उपकेंद्राच्या पी. एम. शिंदे (ए.एन.एम.), पी. एम. मडके (बी. एफ.), जाधव एस.जी.(एल.एच.व्ही) आशा कार्यकर्त्या व्हि. एस. जोशी,एस. ए.मडके, आर. जे. सुडके, एस. पी. सुडके तसेच स्वयंसेविका बी. पी. सुडके यांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे सर, पर्यवेक्षक सतीश कानगुडे सर, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुनील साबळे,शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन