March 26, 2026

सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी;कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  • कळंब – कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
    या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,धाराशिव जिल्ह्यात विशेषतःकळंब तालुक्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली असून शेतात पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अनेकांचे पशुधन वाहून गेले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
    निवडणुका होताच सरकारची भूमिका बदलली असून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी करण्यात आली आहे.हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांवरून मदत केवळ ६ हजार रुपये करण्यात आली आहे. त्यातही शेतकऱ्यांना मदत नाकारण्यासाठी ई-पीक पाहणी, पीककापणी प्रयोग अशा असाह्यकारी अटी लादल्या आहेत. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत.
    सरकारच्या निष्क्रीय धोरणाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून,तात्काळ नियम व अटी शिथिल करून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा देण्यात आला आहे.
    या प्रसंगी तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर यांच्यासह किरण मस्के, तुषार वाघमारे,समाधान वाघमारे, सलमा सौदागर,भिमा हगारे, आफताब तांबोळी,अतिष वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!