धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणेश आगमन (मूर्ती स्थापना) उत्सव साजरा होणार आहे.उत्सव शांततेत व सुसंवादाने पार पडावा,यासाठी महाराष्ट्र दारुबंदी कायदा,१९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये धाराशिव जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या एका दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कायद्यानुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान