March 26, 2026

प्रा.अविनाश घोडके यांचे अभिष्टचिंतन उत्साहात संपन्न

  • कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्येरत असलेले सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२१ ऑगस्ट २०२५ वार गुरुवार रोजी त्यांचा भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे आदींनी प्रा.अविनाश घोडके यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
  • यानंतर सायंकाळी ५ वाजता प्रबुद्ध रंगभूमी बहुउददेशीय संस्था,कळंब संचलित साक्षी कोचिंग क्लासेसवर इयत्ता १० वी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वतीने सत्कार करून केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.

  • याप्रसंगी कृष्णा गायकवाड,आर्यन रणदिवे,आकाश कुपकर,पृथ्वी गायकवाड,गौरी मेटे,दीक्षा गायकवाड,राजनंदनी सावंत, सिद्धी रणदिवे वैष्णवी मुरकुटे,जागृती माने आदींची उपस्थिती होती.

  • शहरातील पत्रकार बांधवांच्या वतीने सुनिल कॉम्प्लेक्स येथे दै.धाराशिव नामाच्या कार्यालयात सा.साक्षी पावनज्योत कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांना शहर प्रतिनिधी अशोक कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार,गुलाबफुल देवून सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी सा.साक्षी पावनज्योत शहर प्रतिनिधी महेश फाटक,विशेष प्रतिनिधी राजेंद्र बारगुले,शिराढोण सर्कल प्रतिनिधी परमेश्वर खडबडे आदींची उपस्थिती होती.
  • विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,कळंबच्या वतीने संध्याकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संदीप झेरॉक्स सेंटर येथे सामाजिक कार्यकर्ते शेळके यांच्या हस्ते शाल,फेटा,पुष्पहार व संविधानाची प्रत देवून त्यांचे अभिष्टचिंतन उत्साहात करण्यात आले.
    याप्रसंगी स्मारक समितीचे विश्वस्त सुनिल गायकवाड,रिपब्लिकन इंडिया पार्टी (आठवले)गटाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिरसट,दै.दिव्य मराठी शहर प्रतिनिधी शितलकुमार घोंगडे,यशदीप फायनान्सचे चेअरमन दत्ताजी शेवडे, प्रसिद्ध व्यापारी राम बडे,वंचितचे सचिन तिरकर,प्रवीण गायकवाड,मेजर प्रशांत हौसलमल आदींची उपस्थिती होती.ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौकात पत्रकार संघाचे विश्वस्त सतिश टोणगे यांच्या हस्ते शाल व पुष्पहाराने अविनाश घोडके यांचा सत्कार करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
    याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज आडसूळ, सा.साक्षी पावनज्योत मुख्य संपादक सुभाष द.घोडके, उपसंपादक माधवसिंग राजपूत, शिराढोण सर्कल प्रतिनिधी परमेश्वर खडबडे,सा.नमस्ते धाराशिव संपादक संदीप कोकाटे आदींची उपस्थिती होती.
  • युथ पॉवर ग्रुपच्या वतीने आनंद रणदिवे व अविनाश घोडके यांचे अभिष्टचिंतन शहरातील लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे चौकातील मैत्री हॉटेलमध्ये केक कापून करण्यात आले.
    याप्रसंगी ग्रुपचे प्रमुख सुरज गायकवाड,लखन हौसलमल,सागर उबाळे,सागर पट्टेकर,प्रवीण पवार,अजित हौसलमल आदी मित्रपरिवारांच्या उपस्थिती होती.

 

error: Content is protected !!