February 8, 2026

धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्यसेवांचा नवा अध्याय

  • धाराशिव (जिमाका) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे मागील काही महिन्यांत आरोग्यसेवेत मोठी प्रगती झाली आहे.प्रभारी अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार,अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात आले असून,विशेष म्हणजे,एका संस्थेच्या पुढाकारातून एकाच महिन्यात दोन देहदान झाले आहेत.
    या रुग्णालयात जटिल शस्त्रक्रियांचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.मणक्याची शस्त्रक्रिया,जबड्याची शस्त्रक्रिया,आर्थोस्कोपी,प्रोस्टेट तसेच लॅप्रोस्कोपद्वारे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत.रुग्णसेवेत सुधारणा म्हणून शस्त्रगृहांची संख्या ४ वरून ८ आणि आयसीयुतील बेड संख्या ५ वरून १२ करण्यात आली आहे.
    डिजिटल इंडिया मिशनअंतर्गत रुग्णालयात Next Gen HMIS प्रणाली सुरू करण्यात आली असून रुग्णांच्या नोंदी आता आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबरवर उपलब्ध होणार आहेत.तसेच,रुग्णसेवेसाठी अत्यावश्यक असलेले MRI मशीन पुढील आठवड्यात कार्यान्वित होणार आहे.
    शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीनेही महाविद्यालयाला यश मिळाले आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक तर्फे Critical Care Unit Fellowship साठी परवानगी मिळाली असून,डीएनबी नवी दिल्ली संस्थेमार्फत शल्यचिकित्सा व स्त्रीरोग विभागात दोन जागांना मान्यता मिळाली आहे.या अभ्यासक्रमांत पदव्युत्तर विद्यार्थी रुजू झाले आहेत.
    रुग्णालयातील सेवेमुळे मृत्यूदर व संदर्भित रुग्णांच्या संख्येत तब्बल २५ टक्क्यांची घट झाली आहे.या कामगिरीमुळे जिल्ह्यातील रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहेत.
error: Content is protected !!