February 8, 2026

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नगर परिषद कळंब येथे शिष्यवृत्ती धारक पार्थ खडबडे याचा सत्कार

  • कळंब – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी नगर परिषद कळंब येथे आयोजित प्रमुख कार्यक्रमात सा.साक्षी पावनज्योत शिराढोण सर्कल प्रतिनिधी परमेश्वर खडबडे यांचे चिरंजीव व पीएम श्री नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.२ चा शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी पार्थ परमेश्वर खडबडे याचा सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमात नगर परिषदेचे मुख्य सीईओ गुरमे साहेब,शाळेचे मुख्याध्यापक नांगरे व सौ.पाटील मॅडम यांच्या हस्ते पार्थचा गौरव करण्यात आला.शिष्यवृत्ती मिळवून शाळेचा मान वाढविल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी पार्थचे अभिनंदन केले.
    नगर परिषद कळंब तर्फे आयोजित या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच शिस्त, परिश्रम व समाजासाठी जबाबदार नागरिक होण्याचे मार्गदर्शन केले.
    या प्रसंगी पालक,शिक्षक, नगर परिषदेचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्याचा झालेला गौरव शाळा आणि नगर परिषदेच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरला.
error: Content is protected !!