August 11, 2025

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धाराशिव तालुका कार्यकारणी जाहीर

  • धाराशिव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या धाराशिव तालुक्याची कार्यकारणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर यांनी दि.१० ऑगस्ट रोजी जाहीर केली.या कार्यकारणीमध्ये ग्रामीण भागातील नवयुवकांना नेतृत्वाला संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी ही टीम जोमाने कामाला लागली आहे.
    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची धाराशिव तालुका कार्यकारणीची निवड धाराशिव शहरातील काँग्रेस भवनमध्ये कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव तालुका उपाध्यक्षपदी बालाजी हुबाले (येवती),भालचंद्र कळमकर (उपळा मा.),सुधीर गव्हाणे (रुईभर) यांची तर तालुका सरचिटणीसपदी लक्ष्मीकांत खटके (नांदुर्गा), अमोल पाटील (सांगवी), महेश उंबरे (वाघोली), विकास ढवळे (पाडोळी आ.) व रहीम मुलाणी (कोंड) यांची तसेच तालुका सचिवपदी चंद्रकांत माळी (तेर), अकबर शेख (राजुरी) व दिगंबर गायकवाड (टाकळी बें.) यांची तसेच तालुका सहसचिवपदी धनंजय पाटील (अनुसूर्डा), जाफर शेख (सुंभा), रामेश्वर लोकरे (घुगी) व इमाम शेख-पटेल (बोरगाव राजे) यांची आणि तालुका खजिनदारपदी ऍड राजुदास आडे (शिंगोली) यांची निवड करण्यात आली. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, आयुब पठाण, महबूब पटेल, धनंजय राऊत, भारत काटे, संकेत पडवळ, संतोष वडवले, प्रकाश माळी, विजय चव्हाण, कानिफनाथ देवकुळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!