August 9, 2025

कळंबमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी नेत्रआरोग्य जनजागृती

  • डॉ.निसाले यांचे मार्गदर्शन,मोफत तपासणी शिबिर
  • कळंब – मोबाईलचा वाढता वापर आणि त्यामुळे उद्भवणारे दृष्टीदोष लक्षात घेऊन इनरव्हील क्लब ऑफ कळंब यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी नेत्ररोग जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळंब येथे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. संकेत निसाले (M.B.B.S., M.S.) यांनी डोळ्यांचे आरोग्य,दृष्टीदोष,योग्य आहार व उपचार याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमात ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्य व इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ.मीनाक्षी शिंदे (भवर) यांनी ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाच्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना डोळ्यांचे महत्त्व पटवून दिले.इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा भवर (गांगर्डे) यांनी डॉ.निसाले यांना विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी करण्याचे आवाहन केले.
    या निमित्ताने डॉ.निसाले यांनी त्यांच्या श्री समर्थ क्लिनिक,कळंब येथे दि.२८ जुलै ते ९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
    या उपक्रमात इनरव्हील क्लबच्या सौ.प्रतिभा भवर (गांगर्डे), सचिव डॉ.दिपाली लोंढे,माजी अध्यक्षा डॉ.मीनाक्षी शिंदे,सदस्य सौ.प्रफुलता मांडवकर, सौ. राजश्री देशमुख,सौ.वैष्णवी दशरथ,डॉ.मेघा आवटे,सौ.प्रा. संगीता शेळके (कदम), प्रा.सुमन मिटकरी (जाधव),सौ.भारती शिंदे (व्‍यंकटेश मेडिकल),तसेच शाळेचे मुख्याध्यापक काकासाहेब मुंडे, उपमुख्याध्यापक सांवत, पर्यवेक्षक गोंदकर आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    या प्रोजेक्टच्या चेअरमन म्हणून प्रा.सुमन मिटकरी यांनी विशेष कार्यभार सांभाळला,तर प्रा. संगीता शेळके (कदम) यांनी सर्वांचे आभार मानले.
    उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेत्रारोग्याविषयी जनजागृती निर्माण झाली असून शिबिरामुळे वेळेवर उपचार होण्यास मदत होणार आहे.
error: Content is protected !!